प्रकाश आंबेडकरांनी दिला ‘आप’ला युतीचा प्रस्ताव

मुंबई – कॉंग्रेस पक्ष आघाडीबाबत दाद देत नसल्यामुळे कंटाळलेल्या भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी वैतागून गुरुवारी चक्क आम आदमी पक्षासमोरच आघाडीचा प्रस्ताव ठेवला.

आंबेडकर यांच्या पुढाकाराने सहा महिन्यांपूर्वी राज्यात महाराष्ट्रात लोकशाही आघाडी (एमडीएफ) अस्तित्वात आली होती. आंबेडकर हे या आघाडीचे निमंत्रकही आहेत. कॉंग्रेसशी आघाडीसाठी आंबेडकर इच्छुक होते. अवधी देऊनही दिल्लीश्‍वरांचा आघाडीबाबत निर्णय होत नसल्याने कंटाळून शेवटी एमडीएमने ‘आप’ समोर मैत्रीचा हात पुढे केला.

Leave a Comment