पुतीन गेंड्याच्या कातडीचे नेते- हिलरी क्लिंटन

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे गेंड्याच्या कातडीचे नेते असल्याची टीका अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी केली आहे. कॅलिफोर्निया विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना हिलरी म्हणाल्या  पुतीन पुन्हा एकदा सोव्हीएट संघ बनविण्याच्या प्रयत्नात आहेत मात्र त्यामुळे प्रत्यक्षात रशियाची क्षमता नष्ट करण्याचेच काम ते करत आहेत. युरोपातील शांततेला त्यांच्या या कृत्यांमुळे धोका निर्माण झाला आहे.

एकच दिवसापूर्वी हिलरी यांनी पुतीन यांची तुलना जर्मन हुकुमशहा हिटलर याच्याबरोबर केली होती. युक्रेनविषयी बोलताना त्या म्हणाल्या होत्या की ३० च्या दशकात हिटलरने चेकोस्लोव्हाकिया, रोमानिया आणि युरोपमधील कांही देशांत जसा हस्तक्षेप केला तसाच पुतीन युक्रेनमध्ये करत आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा आपण ३० व्या दशकांत गेल्यासारखे वाटते आहे.

Leave a Comment