बसप’च्या सात उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई- लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षाने राज्यातील लोकसभेच्या सात उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. यात चाटे क्लासेस समूहाचे संचालक मच्छिंद्र चाटे यांना उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचे राज्य प्रमुख विलास गरुड यांनी सांगितले. राज्यात बसप सर्व जागांवर निवडणुका लढवणार असून दुसरी यादी सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे. यात विदर्भातील उमेदवारांचा समावेश असेल.

पहिल्या यादीत बसपचे उत्तर पश्चिम मुंबई-पुष्पा भोळे, दक्षिण मध्य मुंबई -अ‍ॅड. गणेश अय्यर, उत्तर मुंबई-अशोक सिंग, लातूर-दीपक कांबळे, नांदेड-हबीब शेख, नाशिक -दिनकर पाटील असे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

Leave a Comment