खासदार संजय निरुपमने केला आचारसंहितेचा भंग

मुंबई- आचारसंहिता लागू झाल्यानंतर एका रस्त्याचे उद्घाटन कॉग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी केले आहे. त्या मुळे खासदार निरूपम यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यात आली आहे. भाजप नगरसेवक विनोद शेलार यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकसभा निवडणूकीची घोषणा ५ मार्च रोजी करण्यात आली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्वत्र आचारसंहिता लागू झाली होती. त्यािनंतर खासदार निरुपम यांनी बुधवारी दुपारी एका रस्त्याचे उद्घाटन केल्याचा आरोप शेलार यांनी करीत दिंडोशी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे.

याबाबत बोलताना खासदार निरुपम यांनी निवडणूक जाहीर होवून आचारसंहिता लागू झाल्यानंतर आपण या परिसरातील कुठल्याही रस्त्याचे उद्घाटन केले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे केवळ आपल्याविरुद्ध राजकीय इर्षेने प्रेरीत होवून अशा स्वरूपाचे षड़्यंत्र रचले जात असल्याचा आरोप विरोधकाकडून केला जात असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment