सर्वात पॉवरफुल कॅमेरा असलेला आप्पो स्मार्टफोन

चीनमधील आप्पोने जगातील सर्वाधिक पॉवरफुल कॅमेरा असलेला फाईंड ७ हा स्मार्टफोन १९ मार्चला बिजिंग येथे सुरू होत असलेल्या आप्पो लाँच इव्हेंटमध्ये सादर करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या स्मार्टफोनला ५० मेगापिकसलचा कॅमेरा असेल असे समजते.

चीनी स्मार्टफोन मेकर बाजारात आणत असलेला हा स्मार्टफोन ल्युमिया १०२० शी स्पर्धा करण्यासाठीच बाजारात आणला आहे. यापूर्वी सॅमसंग गॅलेक्सी एस पाच ला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा होता तर ल्युमियाने १०२० मॉडेलसाठी ४१ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. आप्पो फाईंड सेव्हन ला ५.५ इंचाचा स्क्रीन, सर्वात उत्तम एचडी डिस्प्ले, स्नॅप ड्रॅगनचा ८०१ एसओसी प्रोसेसर दिला गेला आहे. या फोन वॉटरप्रूफ आहे तसेच त्याला ग्लोव्ह टन फिचरही दिले गेले आहे. या फोनची बॅटरी रिमुव्हेबल असून ही नोकिया ल्युमियासाठी काळजीची बाब ठरू शकते कारण त्यांच्या फोनला रिमुव्हेबल बॅटरी नाही असे जाणकारांचे मत आहे.