पाकच्या विजयाने टीम इंडियाचे पॅकअप

ढाकाः अशिया कप स्पर्धेतील रोमहर्षक लढतीत पाकिस्तानने बांगलादेशला तीन विकेटनी पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे टीम इंडियाला पॅकअप करावे लागले आहे. पाकिस्तानने स्पर्धेत चारपैकी तीन विजय मिळवले. जेतेपदासाठी श्रीलंका-पाकिस्तानमध्ये ८ मार्चला लढत होईल. त्यामुळे बुधवारी होणारी भारत-अफगाणिस्तान लढत आता औपचारीक असणार आहे.

ढाक्यातील नॅशनल स्टेडियमवरील या लढतीत प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित ५० षटकांत ३ बाद ३२६ धावा केल्या. ही त्यांची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या. बांगलादेशकडून अनामुल हक आणि इमरुल कयास यांनी १५० धावांची सलामी दिली. कयास ७५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५९ धावा काढून बाद झाला. २१ वर्षीय अनामुल हक १३२ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह १०० धावा काढून बाद झाला.

धावाचा पाठलाग करताना पाकच्या शाहीद आफ्रिदीने २५ चेंडून ५९ धावा करीत पुन्हार एकदा पाकला विजय मिळवून दिला. स्कोअरबोर्ड: बांगलादेश ३ बाद ३२६ (अनामुल हक १००, इमरुल कयास ५९, मोमिनुल हक ५१, मशफिकर रहिम नाबाद ५१, शकीब अल हसन नाबाद ४४) पराभूत वि. पाकिस्तान ७ बाद ३२९ (अहमद शेहझाद १०३, फवाद अलाम ७४, शाहीद आफ्रिदी ५९, हफीझ ५२, मोमिनुल हक २-३७).

Leave a Comment