अजित पवारांना भीती दगाफटक्याची

पुणे- लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षअंतर्गत विरोध होवू नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. पिंपरी चिंचवड या राष्ट्रावादीच्याष बालेकिल्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तयारी सुरू केली आहे. आगामी काळात होत असलेल्या‍ लोकसभा निवडणुकीत या गटबाजीचा फटका बसू नये म्हणून त्यांनी प्रयत्त्न सुरू केले आहेत.

पिंपरी – चिंचवड मतदारसंघात अंर्तगत येत असलेल्या् भोसरी विधानसभा मतदार संघातले महेश लांडगे यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद बहाल करुन दादांनी बेरजेच्यां राजकारणाला सुरुवात केली आहे.त्याअमु‍ळे आगामी काळात शिरूर लोकसभा मतदारसंघात होणा-या संभाव्य गटबाजीला लगाम लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे देवदत्त निकम यांच्यात सामना रंगणार हे स्पष्ट झाले आहे. पण सेनेच्या आढळराव पाटील यांच्या तुलनेत देवदत्त निकम अगदीच नवखा उमेदवार आहे. त्यामुळे पक्षाच्या या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मतदारसंघातली गटबाजी मोडण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने पावले टाकायला सुरुवात केली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून दादांनी शिरूर मतदारसंघात येणा-या भोसरी विधानसभा मतदार संघात गटबाजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. या मतदारसंघात आमदार विलास लांडे आणि महेश लांडगे यांचा परस्पर संघर्ष संपूर्ण शहराला माहीत आहे. त्यामुळे दादांनी महेश लांडगे यांना स्थायी समितीचं अध्यक्षपद देत हा संघर्ष दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. महेश लांडगे हे आगामी काळात होत असलेल्याद विधानसभा निवडणुकीत आपण दावेदार असल्याचे सांगत आहेत. केवळ स्थायी समिती अध्यक्षपद मिळाले म्हणून महत्वाकांक्षेला लगाम घालणार नाही हे लांडगेंनी स्पष्ट केले आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघात येणा-या सहा पैकी हडपसर वगळता इतर पाचही मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातली गटबाजी दूर करण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची व्युहरचना आहे. या भागातली गटबाजी दूर झाली तर शिरूरमध्ये देवदत्त निकम आढळराव यांचा पराभव करून चमत्कार करतील अशी आशा पक्षाला आहे. त्याशमुळे त्यांआनी ही तयारीस सुरू केली आहे.

Leave a Comment