शेअर दलाल केतन पारेखला सक्तमजुरी

मुंबई – शेअर बाजारातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी शेअर दलाल केतन पारेख याला मुंबईतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने सोमवारी दोन वर्षांच्या कारावासाची व ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. गुजरातमधील माधवपुरा को. ऑपरेटिव्ह बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी या बँकेने केतन पारेख याच्याविरोधात २००१मध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ११९९ ते २००१मध्ये शेअर बाजारात झालेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यातील केतन पारेख हा मुख्य आरोपी आहे. त्याबद्दल त्याला २००१मध्ये अटकही झाली. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती.

फर्मच्या प्रवर्तकाशी हातमिळवणी करून शेअर व्यवहारात गैरप्रकार करण्याची पद्धत केतनकडून वापरली जात होती. या व्यवहारासाठी त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी ग्लोबल ट्रस्ट बँक (जीटीबी) व माधवपुरा मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेतून वित्तीय सहाय्य घेतले होते. पुढे जीटीबी बँक ओरिएंटल बँकेत विलीन झाली. पण माधवपुरा बँक बुडीत गेली. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर सेबीने डिसेंबर २००३ मध्ये केतन पारेखवर शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी १४ वर्षांची बंदी घातली. होती. कनिष्ठ कोर्टाने २००१मध्ये केतन पारेख याला दिलेला जामीन रद्द करण्यासाठी सीबीआयने २००५मध्ये सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. त्याला त्याने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. केतन पारेख याने विविध बँकांकडून घेतलेली ३९६ कोटी ६३ लाख रुपयांची कर्जाऊ रक्कम तीन हफ्त्यात फेडण्याची अट घालत सुप्रीम कोर्टाने त्याचा जामीन कायम ठेवला होता.

Leave a Comment