गडकरींची ‘ऑफर’ राज ठाकरे धुडकावणार

मुंबई- भाजप नेते नितीन गडकरी यांनी सोमवारी राज ठाकरे यांची भेट घेवून आगामी काळात निवडणूक न लढविण्यायची ‘ऑफर’ दिली होती. ती ‘ऑफर’ राज ठाकरे हे धुडकावणार असल्याचे वृत्त विश्‍वसनीय सुत्रांनी दिले आहे. आगामी काळात होत असलेल्या ’लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागांऐवजी ज्या ठिाकणी मनसेचा प्रभाव आहे, अशा मतदारसंघातून मनसेचे ‘इंजिन’ धावणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

एकीकडे सोमवारी दुपारी नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतली असल्या ने वादंग उठले आहे. या भेटीत गडकरींनी काँग्रेसमुक्त भारतासाठी मनसेने लोकसभा निवडणूक लढवू नये अशी गळ राज ठाकरे यांना घातली होती. तसेच विधानसभा निवडणूकीपुर्वी मनसेने महायुतीत सामील व्हावे यासाठी गडकरींनी राज ठाकरेंशी चर्चा केली होती. मात्र, नितीन गडकरी यांनी ठेवलेल्याज या दोन ऑफर राज ठाकरे धुडकावून लावतील अशी चर्चा आहे.

आगामी काळात होत असलेली लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी गेल्यां काही दिवसांपासून राज ठाकरे तयारी करत आहेत. महायुतीत सामील झाल्यास शिवसेना, आरपीआय, भाजपसोबत जागा वाटप होईल. त्यामुळे ठराविक जिल्ह्यांमध्येच पक्ष वाढेल असे राज ठाकरे व त्यांच्या सहका-यांना वाटते. त्यामुळे महायुतीतही ते सामील होणार नाही असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment