कल्याण- आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीसाठी महायुतीतील भाजपच्याल वाटयाला असलेला भिवंडी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने भाजपकडून हिसकावून घेतला आहे. त्याामुळे भिवंडीतील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. भिवंडी मतदारसंघात अचानक बदल कारण्यात आल्याने चलबिचल सुरू झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात आहे. ऐन लोकसभा निवडणूकीच्याय तोंडावर शिवसेनेला तेथून उमेदवारी देण्यात आल्याने भाजपचे कार्यकर्ते संतापले आहेत. त्याचा निषेध व्यक्त करत सोमवारी शेकडो कार्यकर्त्यांनी कल्याण जिल्हा भाजप कार्यालयात गोंधळ घातला. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे आदी ज्येष्ठ नेत्यांच्या नावाने खडेफोड करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता.
भिवंडी मतदार संघातील माजी आमदार संजय केळकर, कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. भिवंडी शिवसेनेला दिल्याचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी कल्याण-डोंबिवली परिसरातील शेकडो कार्यकत्रे प्रदेशाध्यक्षांच्या कार्यालयात ठिय्या मांडणार आहेत. भिवंडी मतदारसंघ भाजपला न मिळाल्यास भाजपचा एकही कार्यकर्ता निवडणुकीचे काम करणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्याचे जिल्हाध्यक्ष पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात कसा मार्ग काढला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.