नदाल व सॅम्प्रास मुंबईकडून खेळणार

मुंबई: आागमी काळात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रीमियर टेनिस लीगसाठी नदाल आणि सॅम्प्रसला मुंबईच्या संघाने करारबद्ध केले आहे. त्याआमुळे आता टेनिसस्टार राफेल नदाल आणि माजी वर्ल्ड नंबर वन पीट सॅम्प्रस आता मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. भारताचा टेनिसस्टार महेश भूपतीच्या पुढाकारामुळे होत असलेली ही स्पर्धा भारतात २८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई संघात नदाल, सॅम्प्राससह रोहन बोपन्ना, सानिया मिर्झा या खेळाडूंचा सहभाग आहे. तर गेल मोनफिल्स, अॅना इव्हानोविच आणि फॅब्रिस सँतोरो या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीही मुंबईच्या संघाशी करार केला आहे. त्याहमुळे आंतरराष्ट्रीय प्रीमियर टेनिस लीगसाठी मुंबईची टीम तगडी बनली आहे.

आंतरराष्ट्रीय प्रीमियर टेनिस लीगसाठी रविवारी दुबईत खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. सर्बियाचा नोवाक जोकोव्हिचला दुबईच्या संघाने, ब्रिटनच्या अँडी मरेला बँकॉकच्या संघाने करारबद्ध केले आहे. तर सिंगापूरच्या संघात आंद्रे आगासी, सेरेना विल्यम्सची निवड झाली आहे. आगामी काळात होत असलेल्या या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment