तिस-या पक्षाला मत देवू नये – उद्धव ठाकरे

मुंबई – लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच संपूर्ण देशात एनडीएच्या बाजूने वातावरण आहे. यामुळे यावेळेसच्या निवडणुकीत खरी लढत ही एनडीए आणि यूपीएतच होणार आहे. त्यामुळे मतदारांनी भूलथापाला बळी न पडता तिस-या कुणाला मत दिले तर ते कॉंग्रेसला मत देण्यासारखेच असल्याचे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक आणि अधिस्वीकृती पत्रकारांना ‘बेस्ट’ पासचे वितरण करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आगामी लोकसभा निवडणुकीत जिंकायचेच या निर्धाराने महायुती निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून काही झाले तरी आम्ही जिंकणारच, असा विश्वाचस उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सध्या देशात सध्या कॉंग्रेसविरोधी वातावरण असून गेल्या दहा ते पंधरा वर्षांतील कारभाराला जनता आता कंटाळली आहे. त्यामुळेच एनडीएच्या बाजूने वातावरण असल्याचा विश्वारस व्यक्त करतानाच निवडणुकांच्या तोंडावर कॉंग्रेसने कितीही घोषणा केल्या तरी यावेळी जनता त्यांना भुलणार नाही. सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना शेतकर्यां ची वीज बिले माफ करणार अशी घोषणा केली. शून्य किमतीची बिले पाठवून निवडणूक जिंकली व सत्तेत येताच दामदुप्पट बिले वसूल केली हे जनता अजून विसरलेली नाही.’

Leave a Comment