मार्क झुकेरबर्गच्या संपत्तीत १५ अब्ज डॉलर्सची वाढ

फेसबुक या जगविख्यात सोशल नेटवर्कींग साईटचा संस्थापक २९ वर्षीय  मार्क झुकेरबर्ग याची संपत्ती १५ अब्ज डॉलर्सनी वाढली आहे. मार्कची एकूण संपत्ती आहे ३३ अब्ज डॉलर्स. फेसबुकच्या शेअरमध्ये आलेल्या प्रचंड तेजीमुळे ही वाढ झाल्याचे सांगितले जात असून मार्क कडे फेसबुकचे ४७,८९,१४,४६५ इतके शेअर्स आहेत. विशेष म्हणजे जेव्हा फेसबुकचे शेअर ओपन झाले तेव्हा गुंतवणूकदारांना त्यांच्यावर फारसा विश्वास नव्हता. मात्र गेल्या दोन वर्षात मोठ्ंया संख्येने या शेअरना मागणी असल्याने त्यांचे भाव ८० टक्क्यांनी वाढले आहेत.

फेसबुकला मोबाईल प्लॅटफार्मच्या माध्यमातून होणारी कमाई लक्षणीयरित्या वाढल्याने फेसबुकमध्ये गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार अधिक पसंती देत आहेत असे दिसून आले आहे.