ब्रायन लारा करतोय कमी वयाच्या तरुणीसोबत डेटींग

मुंबई – काही दिवसांपसून वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटर ब्रायन लारा एका तरुणीसोबत डेटींग करण्यामध्ये व्यस्त दिसत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लारा सध्या जिच्याशी डेटींग करतोय ती तरुणी त्याच्यापेक्षा तब्बल २० वर्षांनी लहान आहे. वयाने लहान असलेल्या तरूणीसोबत तो डेटींग करीत असल्याने लारा फॉर्मात दिसत आहे.

सूत्राने दिलेल्याल माहितीनुसार टेस्ट क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये ४०० रन्स ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज ब्रायन लाराला सध्या २४ वर्षांच्या मिस स्कॉटलंड बोवर्सनं क्लिन बोल्ड केले आहे. ब्रायन लारा आणि बोअर्स यांची भेट पहिल्यांदा मॅन्चेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचा माजी स्ट्रायकर ड्वाइट योर्क यानं घडवून आणली होती. त्याटनंतर आता लारा या मुलीसोबत डेटींग करताना दिसत आहे.

बोअर्सच्या म्हणण्यानुसार, ‘आमचं नातं अजून पहिल्या टप्प्यावरच आहे. आत्ताच ही गोष्ट कुणाला माहित पडावी, अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. पण, ब्रायनने आमच्या प्रेमाला जगभरात जाहीर करून टाकले आहे. ब्रायन लारा एक आकर्षक, रोमांटीक आणि मजेदार व्यक्ती आहे.’ त्यामुळे आगामी काळात किती दिवस हे प्रेम टिकणार याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment