पेमेंट करायचेय? फक्त दोन वेळा डोके हलवा

वस्तू खरेदी करायची आहे पण पाकिट घरीच विसरलेय , परिणामी क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड नाही आणि स्मार्टफोन अजून घेतलेला नाही अशी परिस्थिती कुणावरही येऊ शकते. मात्र आता स्मार्टफोन नसला आणि पाकिटही घरीच राहिले असले तरी तुम्ही मनसोक्त खरेदी करू शकणार आहात. गुगल ग्लासने विकसित केलेल्या अॅपमुळे ही सुविधा उपलब्ध होत असून पेमेंट करण्यासाठी तुम्ही फक्त दोन वेळा डोके हलविले की खरेदीचे पैसे चुकते करता येणार आहेत. अर्थात त्यासाठी गुगल ग्लास मात्र तुमच्याकडे असायला हवी .

ईझ, ग्लासशोल, गुगल ग्लास अॅप वापरून ही सुविधा युजर मिळवू शकणार आहे. आयओएस आणि अॅड्राईड अॅप त्यासाठी युजरकडे असणे महत्त्वाचे आहे. तसेच तुम्ही जेथून खरेदी करता आहात, त्या दुकानदाराकडेही गुगल ग्लास असायला हवी. हे जमले की खरेदी करायची व फक्त दोन वेळा डोके हलवायचे की दुकानदाराला पेमेंट होऊ शकणार आहे.

गुगलने सतत नवीन संशोधन करून अनेक अॅप बाजारात आणली आहेत. गुगल ग्लासच्या सहाय्याने  व्हिडीओ व्हॉईस कमांड शिवाय फोटो काढणे नव्या अॅपमुळे शक्य झाले असून त्यात डोळा मारणे किवा पापणी मिचकावणे इतके केले तरी युजर फोटो काढू शकतात अशी सुविधा आहे. हे अॅप व्हॉईस कमांडपेक्षा जादा वेगवान असल्याचेही सांगितले जात आहे.