कतार स्फोटात पाच भारतीयांचा मृत्यू

दोहा- कतारची राजधानी दोहा येथे मॉलशेजारी असलेल्या एका तुर्कीश रेस्टॉरंटमध्ये झालेल्या स्फोटात पाच भारतीय नागरिकांसह ११ विदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. अन्य ३५ जण जखमी आहेत. कतार सरकारने या स्फोटाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृत भारतीयांचा ओळख पटली असून या स्फोटात रियाज किझाकेमनोलिल, अब्दुल सलीम पालनगड, झकारिया अनाकंदी, व्यंकटेश आणि शेख बाबू या पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या अन्य नागरिकांमध्ये चार जण नेपाळचे आणि दोनजण फिलिपिन्सचे रहिवाशी आहेत. भारतीयांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी भारताचे राजदूत संजीव अरोरा हे कतार सरकारच्या संपर्कात आहेत. रुग्णालयात दाखल केलेल्या १० जखमींमध्ये आठ पुरुश आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. यातील प्रत्येकी तीन नेपाळ आणि पाकिस्तान, दोघे फिलिपिन्स आणि प्रत्येकी एक भारत आणि इजिप्तचे नागरीक असल्याचे समजते.

Leave a Comment