अवयवदान अवघड करणार ?

भारतात अवयव दानाच्या क्षेत्रात ङ्गार काळाबाजार सुरू आहे. या बाबत अनेक नियम असतानाही तो सुरू आहे पण यावर खूप चर्चा झाली आणि लोक अशा निष्कर्षाप्रत आले की अनेक नियम आहेत म्हणूनच ते ङ्गार दुष्कर होऊन बसले आहे. तेव्हा अवयव दान सहजपणे होऊन अनेकांचे जीव वाचणार असतील तर हे नियम थोडे शिथील करावे लागतील असे सरकारच्या लक्षात आले.

भारतात एखाद्या माणसाची किडनी ङ्गेल झाली असेल आणि त्याला ती नवी बसवण्यासाठी कोणाकडून दान म्हणून हवी असेल तर ती दान म्हणून घेता येते पण या दानाचे नियम एवढे कडक आहेत की ही प्रक्रिया सहजपणे होत नाही. अवयवदान करणारी व्यक्ती ही रुग्णाची नातेवाईक असणे ङ्गार आवश्यक आहे. नातेवाईक नसेल तर हे अवयवदान वैध ठरत नाही. कारण एखादा अवयवदाता कोणाला तरी नातेसंंबंध नसतानाही अवयव देतो याचा अर्थ तो पैशाच्या मोबदल्यातच देत असणार. मग असे पैशाने होणारे अवयवदान हे खरे दान नव्हे तर पैशाच्या आशेने केलेले दान ठरते आणि त्यावर बंधन आणले पाहिजे असे सरकारचे मत आहे.

पाकिस्तानात अशा अवयवदानावर कसलेही बंधन नाही. एखाद्या रुग्णाला अवयवाची गरज आहे असे जाहीर झाले की तो देणारांची रांग लागते. तो नातेवाईक आहे की नाही, तो पैसा घेऊन अवयव देत आहे काय, अशी चौकशी कोणी करीत नाही. पैसे घेऊन अवयव दिले तरी चालते. पण भारतात मात्र कोणीही कोणाला अवयव देऊ शकत नाही. त्यामुळे नियमांचा भंग करून काळाबाजार करून अवयव मिळवले जातात. तो काळाबाजार रोखण्यासाठी काही पावले उचलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ज्याला अवयवदान करायचे असेल तो त्या संबंधित रुग्णाचा नातेवाईक नसला तरीही चालेल अशी भूमिका आता सरकारने घेतली आहे पण भारतात कोणताही कायदा तयार करणारे लोक किती किचकट डोक्याचे असतात आणि ते आपली बुद्धी खर्च करून कायदा कसा अवघड करीत असतात याचा अनुभव या कायद्याचा मसुदा तयार करणारांनी आणून दिला आहे. त्यांनी अवयवदान करणारा माणूस रुग्णाचा नातेवाईक नसला तरीही चालेल पण तो त्या रुग्णाशी संबंधित असला पाहिजे अशी सवलत दिली आहे. तो रुग्णाचा मित्र, परिचित, हितचिंतक किंवा शेजारी असला तरीही चालावे अशी खरी कल्पना आहे.

म्हणजे अगदीच काही संबंध नाही आणि अवयव दान करतो याचा अर्थ काही तरी देणे घेणे झालेले असण्याची शक्यता असते. एकंदरीत थोडा दिलासा दिला गेला. पण तो देताना दुसर्‍या इतक्या अटी घातल्या आहेत की हा दिलासा आहे की जाच, अशी शंका यावी. कारण तो दाता रुग्णाचा नातेवाईक नसला तरीही चालेल पण त्या दोघांनी एका चुलीवर शिजवलेला स्वयंपाक किमान दहा वर्षे तरी खाल्लेला असला पाहिजे. तसे पुरावे सादर करावे लागतील. तसे ङ्गोटो सादर करावे लागतील अशा अटी या दिलाशात घातल्या आहेत. या असल्या अटी घालण्याची दुर्बुद्धी ज्यांना सुचते ते लोक खरेच किती विकृत बुद्धीचे असतील याचे नवल वाटते.

जी व्यक्ती एखाद्या रुग्णाच्या नात्यातली नाही ती व्यक्ती रुग्णासोबत १० वर्षे राहून त्याच्या ताटात जेवण कशाला करील ? याचा विचार या लोकांनी केलाच नाही. हा कायदा अशाच विचित्र अटींनी भरलेला आहे. अवयव दात्याने आपले वेडे नाहीत याचाही पुरावा सादर करावा लागेल. त्याने अवयाव दानाची तयारी दाखवल्यानंतर संबंधित डॉक्टर त्याचा आणि त्याच्या कुटुंबियांचा इंटरव्हू घेतील, आपल्या कुटुंबातला हा दाता स्वखुषीनेच अवयवदान करीत आहे याची खात्री त्यांना पटवावी लागेल.

दाता गरीब असेल तर त्याला पैशाचे आमिष दाखवून दानाला प्रवृत्त केलेले असू शकते म्हणून दाता आणि घेता या दोघांनाही आपल्या गेल्या तीन वर्षातल्या उत्पन्नाचा उतारा सादर करावा लागेल. दात्याचे चारित्र्याचे प्रमाणपत्र दाखल करावे लागेल. एवढे कशासाठी तर अवयवदान सोपे जावे म्हणून! आहे की नाही कमाल !

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment