आयपीएलचे अखेरचे सामने भारतात होणार

भुवनेश्वर- आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांची मतमोजणी १५ मेआधी पूर्ण झाल्यास आयपीएलचे अखेरचे काही सामने तरी भारतात होतील. यंदाच्या आयपीएलचे काही सामने भारतात खेळवण्यासाठी काही फ्रँचायझी आग्रही आहेत. त्यामुळे अशी योजना बीसीसीआय कार्यकारिणीच्या बैठकीत आखण्यात आली असल्याचे समजते.

आयपीएलच्या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनात दक्षिण आफ्रिकेला रस आहे. त्यानी नाही म्हटल्यास बांगलादेश तसेच संयुक्त अरब अमिरातीत युएई आयपीएलचे तिस-या अथवा पाचव्या फेरीपर्यंतचे सामने खेळवण्यात येतील. लोकसभेची निवडणुकीची मतमोजणी १५ मेपर्यंत पार पडल्यास आयपीएलचा अखेरचा टप्पा भारतात खेळवण्याचा प्रयत्न असेली असे मत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ल यांनी व्यतक्तप केले.

येत्या ५ मार्चला निवडणूकांच्या तारखा जाहीर करण्यात येतील. १५ मेपर्यंत निवडणूकीची सारी प्रक्रिया आटोपल्यास आयपीएल स्पर्धेतील जास्तीत जास्त सामने भारतात खेळण्यावर भर देण्यात येईल जेणेकरून फ्रँचायझींना गेटमनीतील काही हिस्सा मिळू शकेल तसेच ब्रँडचे प्रमोशनही करता येईल.संयुक्त अरब अमिरातीत आयपीएलचे आयोजन केल्यास खर्चात फारशी वाढ संभवत नाही कारण प्रवासावर फारसा खर्च होणार नाही.

Leave a Comment