लोकसभेच्या मनसे २० जागा लढविणार

मुंबई- लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी काळात होत असलेल्यात लोकसभा निवडणूकीत राज्यात किमान १८ ते २० जागा लढविण्याबाबत विचार करीत आहे. सूत्रांने दिलेल्याण माहितीनुसार आगामी काळात जर ऐनवेळी महायुतीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला तर स्वबळावर लढविण्याच्या मनसेच्या भूमिकेत बदल होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणूकीची तयारी सर्वच पक्षाने सुरू केली आहे. काँग्रेस वगळता भाजप, शिवसेना या पक्षांनी अनेक उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याढचे समजते. तर दुसरीकडे राष्ट्रवादी व भाजपने उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत मनसेकडून मात्र उमेदवार निवडीची प्रक्रिया फारच संथगतीने सुरू असली तरी लवकरच पक्षाकडून सुमारे १८ ते २० उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

उमेदवारांच्या संभाव्य यादीत मुंबईतून बाळा नांदगावकर, शालिनी ठाकरे, आदित्य शिरोडकर, पुण्यातून दीपक पायगुडे, नाशिकमधून प्रदीप पवार वा उत्तमराव ढिकले यांची उमेदवारी फायनल असल्यातचे समजते. गेल्याध काही दिवसांपासून महायुतीकडून मनसेला विचारणा सुरू आहे. त्यांनी मनसेला दोन ते तीन जागांचा प्रस्ताव दिला असल्या चे समजते. मात्र मनसेला महायुतीत किमान ९ जागा तरी मिळायला हव्यात अशी अपेक्षा असल्याचे कळते. लोकसभा निवडणूकपूर्वी मनसेने महायुतीत यावे यासाठी भाजपकडून तसेच शिवसेनेकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर मनसेच्या नेत्यांशी संपर्क साधला जात असल्याचे समजते.

Leave a Comment