भारती एअरटेलची दरवाढ

मुंबई – देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या भारती एअरटेल ने त्यांच्या कांही प्रीपेड प्लॅनसाठी दरवाढ जाहीर केली असून सध्या ही दरवाढ दिल्ली आणि मुंबईसाठी लागू झाली आहे. यामुळे भारतीच्या लक्षावधी ग्राहकांना मोबाईलवर बोलणे यापुढे महागात पडणार आहे.

टू जी स्पेक्ट्रम लिलावानंतर बहुतेक सर्व टेलिकॉम कंपन्यांनी खर्चाचा बोजा ग्राहकावर पडणार असल्याचे संकेत दिलेच होते. त्यानुसार मोबाईल कॉल दरवाढ करणारी भारती एअरटेल पहिली कंपनी बनली आहे. कंपनीने दिल्लीसाठीच्या गोल्ड प्लॅनचे दर ३३ टक्यांनी तर मुंबईसाठीच्या मुंबई प्लॅन १०६ चे दरही ३३ टक्कयांनी वाढविले आहेत. यामुळे ग्राहकांना आता अनुक्रमे दिल्लीसाठी सेकंदाला २ पैसे तर मुंबईसाठी प्रतिमिनिट ४० पैसे मोजावे लागणार आहेत.

Leave a Comment