दुबईत आयआयएमच्या विद्यार्थ्यांना ४४ लाखांचे पॅकेज

दुबई – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधुन (आयआयएम) व्यवस्थापन शाखेची पदवी घेऊन बाहेर पडलेल्या सहा भारतीय विद्यार्थ्यांना दुबईस्थित एका वित्तीय कंपनीत वार्षिक ४४ लाखांच्या वेतनाची आकर्षक नोकरी मिळाली आहे. आयआयएम अहमदाबाद आणि आयआयएम कोलकाताचे हे विद्यार्थी आहेत. अबूधाबीमधील दुनिया फायनान्स कंपनीने या विद्यार्थ्यांना नोकरी दिली असून, त्यांना प्रत्येकी ४४ लाखांचे वार्षिक वेतन मिळणार आहे. त्यांचे हे वेतन करमुक्त असून, कामगिरीनुसार वेळोवेळी वेगवेगळया बोनसचाही लाभ मिळणार आहे. आयआयएम अहमदाबादचे विद्यार्थी राहिलेल्या राजीव काकर यांनी २००८ मध्ये दुनिया फायनान्सची स्थापना केली. ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी अध्यक्ष आहेत. दुनिया फायनान्सने सतत एमबीए पदवीधरांना संधी दिली आहे.