केजरीवाल सत्ते मागे धावतात- अण्णा हजारे

नगर – काही दिवसांपूर्वी आपचे नेते तथा दिल्ली चे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मी १७ मुद्दय़ांचे पत्र दिले होते. त्यासर्व मुद़दयांना पाठिंबा असेल, तर ममता बॅनर्जींप्रमाणे तुम्हालाही पाठिंबा देण्याची तयारी मी दर्शवली होती. मात्र, केजरीवाल यांच्याकडून आतापर्यंत त्याला कसलाच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे अरविंद केजरीवाल हे देशापेक्षा सत्तेच्या मागे अधिक धावत आहेत, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.

याबाबत पुढे बोलताना अण्णा हजारे म्हेणाले, केवळ सत्तेमधून देशाला उज्ज्वल भविष्य मिळू शकणार नाही. त्यामुळे सत्तेच्या मागे धावणारे इतर पक्ष आणि केजरीवाल यांच्यात फरक राहणार नाही. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला. ममता व त्यांचा पक्ष आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. आम्हा दोघांनाही देशाबद्दल तळमळ असल्याने मी त्यांच्या पक्षाला पाठिंबा जाहीर केला.

देशभरातील सर्व पक्षांना बदल घडवण्यासाठी आम्ही १७ मुद्दय़ांचे पत्र दिले होते. त्यां्च्याी अंमलबजावणीस तयार आहात का? असेही आम्हीय सर्वच पक्षांकडे विचारणा केली होती. पण गेल्याय काही दिवसांत कुठल्यामच पक्षाकडून सकामरात्मठक उत्तार आलेले नाही. ममतांनी मात्र सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाला पाठिंबा दर्शविला असल्याचे अण्णा हजारे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट‍ केले.