आदिदासने अश्लील मजकुराच्या टीशर्टची विक्री थांबविली

ब्राझील येथे या वर्षी होत असलेल्या वर्ल्डकप फुटबॉल सामन्यांसाठी आदिदास या क्रीडा सामान बनविणार्‍या जगप्रसिद्ध कंपनीने बनविलेल्या खास टी शर्टची विक्री त्यावरील मजकुराला ब्राझीलने आक्षेप घेतल्यानंतर थांबविली गेली आहे. आदिवासाने या शर्टवर द्विअर्थी अश्लील मजकूर छापल्याने ब्राझील देशाची प्रतिमा मलीन होत असल्याचे ब्राझीलच्या क्रीडा अधिकार्‍यानी तसेच ब्राझीलच्या पंतप्रधान डिल्मा रूसेफ यांनी सांगितल्यावरून या टी शर्टची विक्री थांबविण्याचा कंपनीने निर्णय घेतला असल्याचे समजते.

या टीशर्टवर कमी कपड्यातील मुलींची चित्रे छापली गेली आहेत. कांहीत मुलींचा पार्श्वभाग दाखविला गेला आहे शिवाय त्यावर दोन अर्थी मजकूरही छापले गेले आहेत. यामुळे ब्राझीलच्या पर्यटन विभागाने देशाची प्रतिमा मलीन होत असल्याचे आणि राष्ट्रीय प्रतीके आणि देशाची प्रतिमा यांचा कामुकतेशी संबंध नसतो असा आक्षेप घेतला होता. ब्राझील देशाशी सेक्स अपील जोडण्याचा हा प्रकार असल्याचे टीका सर्व थरातून केली गेली होती.

आदिदास ही कंपनी फुटबॉल वर्ल्डकपची प्रायोजक कंपनीही आहे. तसेच स्पधेसाठी लागणारे बॉलही कंपनीच पुरविणार आहे.. अमेरिकेत या शर्टची विक्री सुरू करण्यात आली होती मात्र ती आता थांबविली गेली असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

Leave a Comment