युजरची प्रायव्हसी आणि फोनचे नियंत्रण थेट युजरच्या हाती ठेवणारा आणि पर्यायाने युजरच्या प्रायव्हसीचे पूर्ण संरक्षण करणारा जगातला पहिला स्मार्टफोन बोईंगने ब्लॅक फोन या नावाने बाजारात आणला आहे. अँड्राईड सेवेवर चालणार्या या फोनला विशेष अॅप जोडली गेली आहेत. यामुळे समजा दुसर्याने हा फोन उघडायचा प्रयत्न केला तर त्यातील सर्व डेटा आपोआप डिलिट होतो.इन्स्क्रीप्शन कॉल्स असे या अॅपचे नाव आहे. दुसर्याने हाताळताच हा फोन काम करण्याचेच थांबवतो.
या फोनला किल स्विच फिचरही दिले गेले आहे यामुळे युजरची सुरक्षा अबाधित राहते. ५.२ इंची स्क्रीन, १६ जीबी स्टोरेज, ड्युअल सिम, ८ मेगा पिक्सल कॅमेरा, वायफाय जीपीएस, ब्ल्यू टूथ अशी याची इतर वैशिष्ठे आहेत. या फोनची किमत ६२९ डॉलर्स इतकी असून भारतात तो सध्या तरी आयात करावा लागणार आहे. भारतात त्याची किमत साधारण ४५ हजार रूपयांपर्यंत जाईल.
कंपनीच्या म्हणण्यानुसार ज्या युजरना आपली माहिती, डेटा सुरक्षित असावा आणि दुसर्याच्या हाती पडू नये अशी काळजी घ्यावी लागते त्यांच्यासाठी हा फोन आदर्श आहे. कंपन्यांतील टॉपचे अधिकारी, राजकारणी, सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती यांच्यासाठी तर तो वरदानच ठरणार आहे