देशातली पहिली इलेक्ट्रिक बस

बंगळूर – भारतातल्या वाहन उद्योगात जिची उत्सुकतेने प्रतिक्षा केली जात होती त्या इलेक्ट्रिकच्या वाहनांचा प्रारंभ कर्नाटकात करण्यात आला आहे. कर्नाटकची राजधानी बंगळूरमध्ये बंगळूर मेट्रोपोलिटन ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशनने पहिली इलेक्ट्रिक सिटी बस रस्त्यावरून पळवली. ही बस पहिले तीन महिने प्रायोगिक तत्वावर कार्यरत राहील.

ही देशातली पहिली इलेक्ट्रिक बस आयटीपीएल पासून केंपेगौडा विमानतळापर्यंत धावेल. ती सकाळी ७ ते संध्याकाळी ७ अशी बारा तास धावेल आणि ती सहा तास चार्जिंगसाठी डेपोत नेली जाईल. त्यासाठी केंपेगौडा बस स्थानकावर चार्जिंगची सोय केलेली आहे.

ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न देशमुख यांनी या गाडीच्या लॉंचिंगच्या वेळी पत्रकारांशी संवाद साधला. ही इलेक्ट्रिक बस बंगळूरमध्ये प्रायोगिक तत्वावर धावत असली तरी अशा पाच हजार बसगाड्या यूरोप खंडातल्या विविध देशांमध्ये कार्यरत आहेत असे ते म्हणाले. या बसची किंमत २ कोटी ७० लाख रुपये आहे.

Leave a Comment