जयललितांच्या समर्थकांना बनविली अनोखी पोस्टर्स

तमीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त फोटोशॉपच्या करामतीने त्याची भली मोठी पोस्टर्स बनविली असून ती राज्यात सर्वत्र झळकत आहेत. जयललिता यांचा ६६ वा वाढदिवस साजरा होत आहे. त्या समर्थकांत अम्मा नावाने प्रसिद्ध आहेत. समर्थकांनी राज्यभर लावलेली त्यांची पोस्टर्स निराळ्याच कारणाने लक्षवेधक ठरली आहेत.

राज्यभर झळकत असलेल्या या पोस्टरमधील एका पोस्टरमध्ये अमेरिकचे अध्यक्ष बराक ओबामा, उत्तर कोरिंयाचे नेते किम जोंग जयललितांचे स्वागत करताना दाखविले गेले आहेत तर अन्य पोस्टरमध्ये जयललिता यांना गुडघे टेकून अभिवादन करताना श्रीलंकेचे राष्ट्रपती महिद्र राजपक्षे दाखविले गेले आहेत. आणखी एका पोस्टरमध्ये  अमेरिकी, जपानी, चिनी नेते टाळ्यांनी जयललितांचे स्वागत करत असल्याचे दाखविले गेले असून यावर इस्ट टू वेस्ट, अम्मा इज बेस्ट असे लिहिले गेले आहे.

जयललिता पंतप्रधानपदाच्या संभाव्य यादीतील नेत्या आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी १४० चित्रपटांतून कामे केली आहेत.त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील संसदेच्या आकाराचा भलामोठा केक कापला गेला तसेच वृक्षारोपण, रक्तदान असेही कार्यक्रम आखले गेले आहेत.