सोशल मिडीयावरील खोटेपणा शोधणारे सॉफ्टवेअर विकसित

सोशल मिडीयाचा वाढता वापर पाहता या माध्यमातून अफवा पसरविण्याचे प्रमाणही लक्षणीय रित्या वाढत चालले आहे. येथे दिल्या जाणार्‍या बातम्या अथवा माहितीचा खरेखोटेपणा पडताळून पाहता यावा आणि संबंधित मजकूर केवळ अफवा पसरविण्याच्या हेतूनेच दिला गेला आहे काय याचा तपास करता यावा यासाठी संशोधन केले जात होते. शेफिल्ड विद्यापीठातील टेक्स्ट मायनिंग तज्ञ व वरीष्ठ संशोधक कलिना बोन्चेव्हा यांनी त्यासाठीचे सॉफ्टवेअर तयार करण्यात यश मिळविले आहे. फेमे असे या सॉफ्टवेअरचे नामकरण करण्यात आले आहे.

या सॉफ्टवेअरमुळे बातमीचा उगम, ट्वीट, ट्वीटची भाषा, त्यातील खरेखोटेपणा त्वरीत समजू शकणार आहे. सॉफ्टवेअरला दिले गेलेले नाव पौराणिक देवीवरून दिले गेले आहे. सोशल मिडियावरील मजकुरात वापरली जाणारी सनसनाटी भाषा आणि तीव्र भावना या केवळ अफवा पसरविण्यासाठी आहेत का त्यात खरोखरच कांही तथ्य आहे याची परिक्षा हे सॉफ्टवेअर माहिती प्रसिद्ध होण्यापूर्वीच करू शकणार आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment