विधान परिषदेसाठी २० मार्च रोजी निवडणूक

मुंबई- महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणूकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. ही निवडणूक येत्या २० मार्च रोजी होणार आहे. विधान परिषदेतील नऊ सदस्य निवृत्त होणार आहेत. त्या जागा आता भरल्या जाणार आहेत. निवडणूकीची घोषणा निवडणूक आयोगाने मंगळवारी केली आहे.

विधान परिषदेचे विद्यमान सदस्य नीलम गोर्हे् (शिवसेना), जयप्रकाश छाजेड, विनोद तावडे व पांडुरंग फुंडकर (भाजप), हेमंत टकले, किरण पावसकर, रणजितसिंग पाटील आणि संजय पाटील (राष्ट्रवादी) आणि शिवाजीराव देशमुख (काँग्रेस) यांची सहा वर्षांची मुदत येत्या २४ एप्रिलला सपंणार असल्या्ने हे सहा सदस्ये निवृत्त होत आहेत.

निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ही निवडणूक होत आहे. निवडणुकीची अधिसूचना ३ मार्च २०१४ रोजी जारी केली जाईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मार्च, २०१४ अर्जांची छाननी ११ मार्च २०१४ , उमेदारांनी आपला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १३ मार्च, २०१४ , मतदान २० मार्च, २०१४, मतदान सकाळी ९.०० वाजता सुरू होईल. दुपारी ४.०० वाजेपर्यंत होईल. त्या२च दिवशी पाच वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.

Leave a Comment