बार्सिलोना – फायरफॉक्स ब्राऊजर संचलित करणारी मोझिला कंपनी विकसनशील देशांतील नागरिकांसाठी १५०० रूपयांपेक्षा कमी किमतीत स्मार्टफोन आणणार आहे. स्वस्तात चीप बनविणार्या चीनी कंपनी स्प्रेडड्रमशी मोझिलाने नुकताच भागीदारी करार केला आहे आणि त्यामुळेच स्वस्तात फोन देणे कंपनीला सहज शक्य असल्याचे समजते.
मोझिलाचे सीइओ जे. सुलीवन म्हणाले की आम्ही विकसनशील देशांतील तसेच कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी मोबाईलची नवी श्रेणी बाजारात आणत असून त्यांची किमत २५ डॉलर्सपेक्षा कमी असेल. यामुळे जगभरातील अनेक नागरिक ऑनलाईन जोडले जातील. भारतात हा फोन कधी येईल या विषयी मात्र कोणताही खुलासा सुलीवन यांनी केलेला नाही.