कॅन्सरशी मुकाबला केलेल्यांसाठी मॅट्रीमोनी साईट

कॅन्सर या दुर्धर व्याधीशी मुकाबला करून विजयी झालेल्यांना योग्य जीवनसाथी मिळावा यासाठी केरळच्या कुंबानाड मधील सेंट मेरी चर्चच्या यूथ चळवळीतील युवकांनी मॅट्रीमोनी साईट सुरू केली आहे. देशातील या प्रकारची ही पहिलीच साईट आहे असे सांगितले जात आहे.

कॅन्सरशी टक्कर दिल्यानंतरही या रूग्णांना जगण्यासाठी धर्य आणि उमेद लागतेच. योग्य जीवनसाथी मिळाला तर हे जगणे अधिक सुकर आणि आनंददायी होऊ शकेल या विचाराने ही साईट सुरू केली गेली आहे. इनसाईट मॅट्रीमोनी डॉट कॉम या नावाने ही साईट सुरू केली गेली आहे. ९ मार्चपासून ती सर्वांसाठी खुली होणार आहे. या निमित्ताने हे रूग्ण समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सामील होऊ शकतील आणि सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगू शकतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment