वेनोम जीटी ठरली सर्वाधिक वेगवान कार - Majha Paper

वेनोम जीटी ठरली सर्वाधिक वेगवान कार

अमेरिकन कंपनी हेन्सीची वेनोम जीटी ही कार जगातील सर्वाधिक वेगवान कार ठरली आहे. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमध्ये या कारच्या घेण्यात आलेल्या चाचणीत तिने तासाला ४३५ किमीचा वेग गाठला. गाडीचा चालक ब्रायन स्मिथ याने हे यश मिळविले. पूर्वी हा विक्रम बुगाटी वेरोन सुपर स्पोर्टस कारच्या नावावर होता. या गाडीचा वेग होता ताशी ४३१ किलोमीटर.

वेनोमने सर्वाधिक वेग गाठला असला तरी हायस्पीड रेकॉर्ड मात्र बुगाटीच्याच नावावर राहणार आहे असे समजते. कारण विक्रम नोंदविताना कार हवेच्या दिशेने आणि हवेच्या विरूद्ध दिशेने चालवावी लागते. वेनोम जीटीचा चालक ब्रायनने स्पेस सेंटरमध्ये एकाच दिशेने कार चालविली आहे त्यामुळे हा विक्रम नोंदला जाणार नाही.

Leave a Comment