विराट कोहलीची कसोटी लागणार

फातुल्ला – आशिया कप क्रिकेट स्पर्धेला मंगळवारपासून सुरूवात झाली आहे; बुधवारी टीम इंडिया आणि बांग्लादेश या दोन्ही संघात लढत होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर आता या स्पर्धेत टीम इंडियाला विजय आवश्यक आहे. या स्पर्धेत कर्णधार महेंद्रसिंग धोनी जखमी असल्याने त्याची धूरा विराट कोहली संभाळत आहे. त्याआमुळे या स्प र्धेत विराट कोहलीच्या कर्णधारपदाची कसोटी लागणार आहे.

आशिया चषकातील सलामी लढतीत यजमान बांग्लादेशाला हरविण्याचे आव्हान नवा कर्णधार विराट कोहली समोर आहे. गेल्या आशिया चषकात कोहलीने चार शतके आणि तीन अर्धशतकांसह ७३२ धावा केल्या. त्यात पाकविरुद्धच्या सामन्याततील सर्वोच्च १८५ धावांचादेखील समावेश आहे. मात्र, आशिया चषकात त्याच्यावर दबाव असेल. २०१२ मध्येदेखील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग आठ कसोटी सामने गमावून भारत आशिया चषक खेळला होता.

बांग्लादेश संघाचा सलामीवीर तमीम इक्बाल जखमी झाल्याने बाहेर आहे. अष्टपैलू शकीब अल हसन याच्यावर असभ्य वागणुकीचा ठपका ठेवून दोन सामन्यांसाठी त्याला निलंबित करण्यात आले. अनुभवी जलद गोलंदाज मुशर्रफ मुर्तझा याच्या गुडघ्यावर सूज आहे. कर्णधार मुशफिकीर रहीम याच्या बोटाला इजा झाली आहे. याशिवाय संघ निवडीतील वादामुळे बांगला संघ चर्चेत राहिला आहे. त्यामुळे बंगलादेश पहिल्याा सामन्याकत दमदार कामगिरी करणार नाही असे वाटत आहे.

टीम इंडियाकडून चेतेश्वर पुजारा मधल्या फळीत, कोहली स्वत तिस-या आणि अजिंक्य रहाणे चौथ्या स्थानावर येईल. याशिवाय दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्वियनकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. मध्यम जलद गोलंदाज असलेला स्टुअर्ट बिन्नी संघासाठी कशी कामगिरी करेल, याकडे लक्ष आहे. त्यामुळेच आगामी काळात विराट कोहलीच्या कर्णधारपदाची कस लागणार आहे.

Leave a Comment