शिवसेना खासदार वाकचौरे यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई- शिर्डी मतदार संघातील शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज (सोमवार) कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार वाकचौरे यांच्या पक्षांतरामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, चिटणीस शौर्यराज वाल्मीकी, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत वाकचौरे यांनी पक्षप्रवेश केला आहे.

पक्षप्रवेशावेळी शिवसैनिकांनी गोंधळ करू नये म्हणून प्रशासनातर्फे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. जाहीर सभा न घेता पक्षप्रवेशाचा सोहळा बंदिस्त सभागृहातच पार पडला. दरम्यान, मतदार संघातील नागरिकांच्या भल्यासाठी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.

Leave a Comment