फसव्या जाहिरातींवर बंदीची मागणी

वृत्तपत्रे उघडली की, अनेक डॉक्टरांच्या जाहिराती नजरेस पडतात. काही जाहिरातीं-मध्ये संधीवातावर जालीम उपाय योजण्याचा दावा केलेला असतो, तर काही जाहिरातींमध्ये चक्क एडस्मधून मुक्ती मिळवून देण्याची ग्वाही दिलेली असते. या जाहिराती तशा संख्येने कमी आहेत. परंतु सध्या समाजामध्ये मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. बैठी कामे, शारीरिक हालचालींचा अभाव आणि व्यायाम न करणे यामुळे या पुढच्या काळात मधुमेहाचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येत्या काही वर्षात निदान शहरात तरी दर तीन व्यक्तीमागे एकजण मधुमेहाचा रुग्ण असेल, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

या परिस्थितीचा गैरङ्गायदा घेण्यासाठी काही भोंदू डॉक्टरांनी मधुमेहापासून कायमची मुक्तता करण्याची हमी देणार्‍या जाहिराती प्रसिद्ध करायला सुरुवात केली आहे. त्यांची औषधे घेतल्यास मधुमेहींचा मधुमेह कायमचा संपुष्टात येतो असे दावे हे डॉक्टर करीत असतात. त्यांच्या औषधाला कसलाही शास्त्रीय आधार नाही, त्यांची औषधे औषधांच्या शास्त्रीय चाचण्यां मधून सिद्ध झालेली नाहीत. त्या औषधांचे घटक नेमके काय आहेत याचाही खुलासा कधी होत नाही. परंतु त्यांच्या जाहिराती मात्र प्रचंड प्रमाणावर प्रसिद्ध होत असतात. त्या औषधाला कसलाही मोठा उत्पादन खर्च नाही. त्यामुळे ते औषध देऊन पेशंटकडून किती पैसे घ्यावेत याला काही माप नाही. साधारण चारशे रुपयां पासून आठ हजार रुपयांपर्यंत फि आकारून हे भोंदू डॉक्टर रुग्णांना औषधे देत असतात आणि रुग्णही मधुमेहाला कंटाळलेले असल्या मुळे या डॉक्टरांच्या आश्‍वासनाला भाळून मागेल तशी ङ्गी देत असतात.

कारण मधुमेहाच्या प्रत्येक रुग्णाला या विकारातून कायमचे मुक्त होण्याची तीव्र इच्छा असते. मधुमेह हा विकार एकदा झाला की, तो कमी-जास्त होतो. मधुमेह झालेली व्यक्ती साखर, गोड पदार्थ किंवा जड पदार्थ ज्या प्रमाणात सेवन करते त्या प्रमाणात रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त होत राहते. परंतु मधुमेह हा विकार पूर्ण दुरुस्त कधीच होत नाही. एखाद्या व्यक्तीला मधुमेह झाला होता आणि तो आता पूर्ण दुरुस्त झाला असून तो मनसोक्तपणे गोड पदार्थ खाऊ शकत आहे असे कधीच घडलेले नाही. वैद्यकीय शास्त्र सुद्धा मधुमेह पूर्ण दुरुस्त होण्याचा दावा करत नाही. जे भोंदू डॉक्टर असा दावा करतात त्यांनी सुद्धा आपल्या कथित पेशंटांना मधुमेहातून पूर्ण सुटका मिळालेली आहे असे सोदाहरण दाखवलेले नाही.

केवळ लोकांना भुलवणे आणि एकदा त्याच्या गळ्यात औषध मारणे एवढाच या लोकांचा उद्योग असतो. जे लोक या औषधांना ङ्गसतात तेही नंतर या भोंदू डॉक्टर कडे जाऊन त्याला जाब विचारत नाहीत. त्यामुळे त्यांचे ङ्गावते आणि नवनवे रुग्ण ङ्गसण्यासाठी त्यांच्याकडे येत राहतात. महाराष्ट्रामध्ये अशा जाहिरातींच्या विरोधात एक कायदा आहे. त्याला ड्रग्ज ऍन्ड मॅजिक रेमेडिज् ऑब्जेक्शनेबल ऍडव्हर्टिजमेंट ऍक्ट १९५४ असे म्हणतात. या कायद्यानुसार शास्त्रीय आधार नसलेली औषधे विकण्याला आणि शास्त्राने सिद्ध न केलेले दावे करण्याला प्रतिबंध घालता येतो. या कायद्याचा भंग करून जाहिरात केल्यास शिक्षा सुद्धा होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारे कावीळ, नागिन अशा विकारांवर मंत्र टाकणारे आणि वनौषधी देणारे काही वैदू किंवा हकीम मोठ्या संख्येने आहेत. वास्तविक त्यांच्या औषधाने हे विकार दुरुस्त होतच नाहीत. पण त्यांचा धंदा मात्र तेजीत चाललेला असतो.

Leave a Comment