खासदार मंडलीक शिवसेनेच्या संपर्कात

मुंबई – आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे दोन खासदार शिवसेना सोडून निघून गेले आहेत. त्यामुळे सेनेत शांत वातावरण असताना शिवसेनेच्या गळाला एक खासदार लागले आहेत. दोन दिवसांपासून कोल्हायपूरचे खासदार सदाशिव मंडलिक सेना नेत्यांच्या संपर्कात आहेत. मंडलिक यांनी शिवसेना नेते सुभाष देसाई व दिवाकार रावते यांची भेट घेतली आहे. दुसरीकडे शिवसेनेने शिडीतून बबनराव घोलप यांना तर ठाण्यामधून राजन विचारे तर सिंधदुर्गातून विनायक राउत यांना उमेदवार म्हणून फायनल केले आहे.

शिर्डीत विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करताच माजी मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते बबनराव घोलप यांना त्यांच्याविरोधात उभे करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. कल्याणचे शिवसेना खासदार आनंद परांजपे यांनीही राष्ट्रवादीशी घरोबा केल्याने ही प्रतिष्ठेची जागा टिकविण्यासाठी ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. र्शीकांत शिंदे यांना मैदानात उतरविण्याचे ठरविले आहे, तर ठाणे मतदारसंघात गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांना आव्हान देण्याची जबाबदारी पक्षाचे आमदार राजन विचारे यांच्यावर सोपविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले, तर नारायण राणे यांचे पुत्र नीलेश यांच्याविरोधात सिंधुदुर्गमधून विनायक राऊत यांना तिकिट देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

कोल्हापूरमधून खासदार सदाशिव मंडलिक यांचे सुपुत्र संजय मंडलिक हे सेनेकडून उमेदवारीसाठी उत्सुक असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. सोमवारी त्यांनी शिवालयात येऊन शिवसेना नेते सुभाष देसाई व दिवाकर रावते यांची भेट घेतली. कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांनी मुन्ना महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले संजय मंडलिक यांच्या मागे वडिलांची मोठी ताकद असून येथून आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी ते जीवाचे रान करतील आणि म्हणूनच सेना संजयला उमेदवारी देण्यास इच्छुक आहे.

Leave a Comment