इंग्लंडच्या २०० वर्षाच्या संसदीय भाषेचा होणार अभ्यास

इंग्लंडच्या संसदेने जगाला संसदीय कामकाजाचे धडे दिले. या समृद्ध संसदीय परंपरेचा वारसा अनेक देशांनी घेतला. संसदीय कामकाजात सहभागी होणारे लोकप्रतिनिधी आपल्या भाषणांनी, विचारांनी ही परंपरा अधिक समृद्ध करत असतात. इंग्लंडच्या संसदेने जगाला संसदीय कामकाजाचे धडे दिले. या समृद्ध संसदीय परंपरेचा वारसा अनेक देशांनी घेतला. संसदीय कामकाजात सहभागी होणारे लोकप्रतिनिधी आपल्या भाषणांनी, विचारांनी ही परंपरा अधिक समृद्ध करत असतात. या समृद्ध वारशाचा आता इंग्लंडमधील भाषातज्ज्ञ अभ्यास करणार आहेत.

२०० वर्षापासून इंग्लंडच्या संसदेत वापरल्या गेलेल्या भाषेचा अभ्यास ते करणार आहेत. हे तज्ज्ञ तब्बल २.३ अब्ज शब्दांचे विश्लेषण करणार आहेत. संसदीय भाषेत झालेले बदल ते नोंदवणार आहेत. ग्लासगो विद्यापीठात शिकणा-या संशोधकांनी हा अभ्यास करण्याचे ठरवले आहे. संसदेत कोणत्या वेळी कोणता विषय उपस्थित केला जातो यावर प्रकाश टाकला जातो. लोकप्रतिनिधींची भाषा त्यांच्या कार्यकाळात कशी बदलली याचा अभ्यास होणार आहे. १८०३ ते २००३ या २०० वर्षाच्या काळातील लोकप्रिय मुद्यांचा अभ्यास केला जाईल. यात प्रामाणिकपणा, सन्मान, समलैंगिकता, युद्ध आणि दहशतवाद आदींचा समावेश असणार आहे.

हा प्रकल्प तब्बल १५ महिन्यांचा असून त्यात इंग्लंडमध्ये झालेल्या संसदीय चर्चाची लेखी नोंद तपासली जाणार आहे. या अभ्यासासाठी संगणकाचा वापर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात संगणक प्रोग्राम विकसित करण्यात येणार असून त्यातून शब्दांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर संसदेत वापरलेले वाक्प्रचार आणि संकल्पना आदींचा विचार करणार आहेत. या प्रकल्पाचे प्रमुख ग्लासगो विद्यापीठाचे प्राध्यापक मार्क अलेक्झांडर आहेत. मोठय़ा प्रमाणावर साठवलेल्या माहितीचे अत्याधुनिक पद्धतीने विश्लेषण करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे समाज आणि संस्कृतीत मोठी भर पडणार आहे, असे अलेक्झांडर यांनी सांगितले.

जागतिक घटना-घडामोडी-पेचप्रसंगांच्या काळात संसदेत कामकाज कसे झाले किंवा त्या काळात वाद-चर्चा कशा झाल्या याचे विश्लेषण करण्यात येईल. माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल व मार्गारेट थॅचर यांची वैयक्तिक भाषा त्यांच्या राजकीय कारकिर्दीत कशी बदलली याचा अभ्यास करता येणार आहे. या प्रकल्पाला आर्टस् अ‍ॅँड ह्युमॅनिटिज रिसर्च कौन्सिल आणि इकॉनॉमिक अ‍ॅँड सोशल रिसर्च कौन्सिल आदींनी निधी पुरवला आहे.

Leave a Comment