अमेरिका सैन्य कपात करणार

वॉशिग्टन – दुसर्‍या महायुद्धापूर्वी जेवढी सैन्य संख्या होती त्या संख्येपर्यंत सैन्य कमी करण्याचा निर्णय अमेरिकेच्या विचाराधीन असल्याचे समजते. त्यात वायुदलाच्या लढाऊ विमानांची आख्खी पलटणच कमी केली जाणार आहे असेही वृत्त आहे. ओबामा सरकारने काटकसरीचे उपाय अनुसरायचा निर्णय घेतल्यानंतर त्याचाच एक भाग म्हणून संरक्षण मंत्री चक हेगल यांनी सैन्य कपातीचा प्रस्ताव मांडला आहे.

अध्यक्ष बराक ओबामा यांनी पूर्वीच अफगाणिस्तान आणि इराकमध्ये अमेरिकी सैन्याचा हस्तक्षेप थांबविला जाईल असे वादा केला आहे. पेंटगॉनमधील वरीष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेवर येणार्‍या प्रत्येक हल्ल्याचा व शत्रूचा नायनाट करता येईल इतके सैन्य ठेवले जाईल. अर्थात एकाचवेळी दोन तीन ठिकाणी युद्ध खेळावे लागले तर थोडी अडचण होईल मात्र तरीही विजय अमेरिकेचाच असेल. कदाचित त्याला थोडा जास्त कालावधी लागेल.

आता जमिनीवरून युद्ध हा प्रकार इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असल्याने इतकी मोठी सेना सांभाळणे अवघड बनत चालले आहे. त्यामुळे २०१७ पर्यंत किमान ८० हजार सैनिकांना निवृत्त केले जाईल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment