विजय झोल एका सामन्यासाठी निलंबीत

दुबई : टीम इंडियाच्या एकोणीस वर्षांखालील क्रिकेट संघाचा कर्णधार विजय झोलवर कारवाई करण्यात आली आहे. कर्णधार झोल यांने उपात्यपूर्व लढतीच्यायवेळी शिवीगाळ केल्याने त्याला एका सामन्यासाठी निलंबीत करण्यात आले आहे. तर ऑफ स्पिनर अमीर गनीलाही सामनाधिका-यांकडून ताकीद मिळाली आहे. त्यामुळे झोल श्रीलंकेविरूद़ध होत असलेल्या सामन्यासाठी खेळू श‍कणार नाही.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या इंग्लंडविरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात विजय झोल व अमीर गनी यांनी असभ्य भाषेत शिवीगाळ केल्याबद्दल दोघांवर ही कारवाई करण्यात आली. झोलने आयसीसीच्या आचारसंहितेचं उल्लंघन निर्वाळा सामनाधिकारी ग्रॅमील ब्रॉयनी दिला. त्यामुळे त्याच्या वर कारवाई करण्यात येत आहे.

त्यामुळे आज श्रीलंकेविरुद्ध होत असलेल्या पाचव्या स्थानासाठीच्या लढतीत सामन्यात झोल खेळू शकणार नाही. या विश्वचषकात इंग्लंडकडून पराभव स्विकारावा लागल्यानं उपांत्यपूर्व सामन्यातच टीम इंडियाचे आव्हान संपुष्टात आले आहे. आता पाचव्या स्थानाच्या लढतीत टीम इंडियाची कामगिरी कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment