विंडोज आठच्या किमती उतरणार

मायक्रोसॉफ्टने आठ महिन्यांपूर्वी बाजारात आणलेल्या विंडोज ८ ऑपरेटिंग सिस्टीमच्या किमती ७० टक्के कमी करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र १५,५०० रूपयांपर्यंत किमती असलेल्या टॅब्लेट व संगणकाच्या उत्पादकांनाच ही सवलत दिली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. गुगल बरोबर कराव्या लागत असलेल्या स्पर्धेमुळे हा निर्णय घेतला गेला असल्याचे समजते.

या सिस्टीमची परवाना किमत यापूर्वी ५० डॉलर्स होती ती आता वरील कॅटॅगरीतील उत्पादकांसाठी १५ डॉलर्सवर आणली जाणार आहे. मायक्रोसॉफ्ट इंडियाचे प्रवक्ते या संदर्भात माहिती देताना म्हणाले की २७ ऑगस्ट २०१३ रोजी ही सिस्टीम बाजारात आली तेव्हापासून आत्तापर्यंत २० कोटी परवाने दिले गेले आहेत. अर्थात विंडोज सातपेक्षा याची विक्री कांहीशी कमी आहे.

तज्ञांच्या मते विंडोज आठ च्या किमतीत घट केल्याचे अनेक फायदे मायक्रोसॉफ्टला मिळणार आहेत. भारातात अॅड्रॅइडचा सध्या असलेला ९० टक्के बाजार हिस्सा  कमी होऊन मायक्रोसॉफ्टचा बाजारहिस्सा वाढण्यास नक्कीच मदत मिळणार आहे.

Leave a Comment