महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकाचा गदारोळ

मुंबई- सोमवारी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. महायुतीसहज मनसे व सर्व विरोधीपक्ष पहिल्याच दिवशी सरकारला धारेवर धरण्यासाठी एकत्र आले आहेत. सोमवारी कामकाज सुरू होताच विरोधकानी गोंधळ घातला त्यामुळे काही वेळासाठी कामकाज तहकूब करावे लागले. त्यामुळे आता आगामी काळात कितीवेळ कामकाज चालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोमवारी सकाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी विधानभवनाच्या पाय-यांवर सरकारविरोधात निदर्शने केली. टोल बंद करा, आदर्श अहवालातील दोषी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांवर कारवाई करण्याच्या घोषणा विरोधकांनी दिल्या. त्या सोबतच कामकाज सुरू झाल्याानंतर राज्यपालांचे अभिभाषण सुरु असतानाही काही विरोधकांनी गोंधळ घातला.

चार दिवस चालणा-या विधीमंडळाच्या या अधिवेशनात आगामी काळात महत्त्वाची १२ विधेयके सादर केली जाणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र सावकारी विधेयक, ग्रामपंचायत सुधारणा विधेयक, पोलिस बदल्या, अस्थापने मंडळे याबाबत तरतूद करणारे सुधारणा विधेयक, पुरवणी विनियोजन विधेयक (२०१४), विनियोजन लेखानुदान विधेयक यांचा प्रामुख्याने समावेश आहे. हे सर्व विधेयक मंजूर होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment