काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी आणखी एक योजना

मुंबई – काळ्या पैशांवर अंकुश आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सुरू केलेल्या उपाययोजनात आता आणखी एका योजनेची भर पडली आहे. रिझर्व्ह बँकेने प्रत्येक खातेदारासाठी एकच युनिक कस्टमर आयडेंटिफिकेशन कोड ठरविण्याचे आदेश बँकांना जारी केले आहेत. यामुळे ग्राहकाने कितीही बँकातून खाती उघडली तरी एकाच आयडेंटिफिकेशन नंबरवर त्यांची नोंद होऊ शकणार आहे. अर्थात त्यासाठी ग्राहकाकडून बँकेला एक फॉर्म भरून घ्यावा लागेल व त्यात ग्राहकाच्या सर्व खात्यांची माहिती द्यावी लागेल.

हा फॉर्म ग्राहकाकडून भरून आल्यानंतरच ग्राहकाला युनिक कोड दिला जाणार आहे असे अलाहाबाद बँकेचे सहाय्यक महासंचालक शाम शंकर यांनी सांगितले. ते म्हणाले हा नंबर ग्राहकाला मिळाल्यानंतर त्याने जमा केलेले पैसे तसेच काढलेले पैसे याचा सर्व बँक खात्यांचा तपशील एका क्लिकवर मिळू शकणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एका बँकेच्या सर्व शाखा प्रथम जोडल्या जाणार आहेत व त्यानंतर सर्व बँका जोडल्या जाणार आहेत.

Leave a Comment