वॉशिंग्टन – अमेरिकेत भारतात बनलेल्या विड्यांना बंदी घालण्यात आलेली आहे. यापुढे अमेरिकेत कोणीही विडी आयात करू शकणार नाही, तयार करू शकणार नाही आणि विकूही शकणार नाही. २००९ साली भारतातून अमेरिकेत विड्या निर्यात करण्यात आल्या, परंतु आजवर अमेरिकेच्या कोणत्याही यंत्रणेने विडीला हरकत घेतलेली नव्हती. ती प्रथमच घेतली गेली.
तेंदू पत्त्यापासून तयार केलेली अमेरिकेत पाठविण्यात येणारी विडी ही सुगंधी आहे हे तिचे वैशिष्ट्य होय. अमेरिकेच्या
इलिनॉईस प्रांतामध्ये जश इंटरनॅशनल या कंपनीतर्फे बनवल्या जाणार्या चार प्रकारच्या विड्यांनाही आता बंदी असेल. २००७ सालपासून अमेरिकेत विड्या तयार होत आहेत. २००९ पासून आयात होत आहेत. परंतु उत्पादनाची आणि आयातीची परवानगी देताना ज्या प्रकारची विडी दाखवली गेली होती त्यापेक्षा या विड्या वेगळ्या आहेत म्हणून त्यांना बंदी घातली गेली आहे.
चार प्रकारच्या विड्यांवर बंदी असेल. सूत्रा विडी रेड, सूत्रा विडी मेंथॉल, सूत्रा विडी रेड कोन आणि सूत्रा विडी मेंथॉल कोन अशा चार प्रकारच्या विड्या आता तयार करता येणार नाहीत. या बंदीचा आदेश मोडणार्यांवर कडक कारवाई केली जाईल असे अमेरिकेच्या प्रशासनाने जाहीर केले आहे.