योग्य बसण्याच्या सूचना देणारा ल्यूमोबेल्ट

आजकाल १२-१२ तास काम करण्याच्या पद्धतीमुळे तरूण वयातच अनेकांना पाठदुखीने हैराण केले आहे. बसण्याची पोझिशन योग्य असेल तर पाठदुखीचा त्रास होत नाही असे डॉक्टर सांगतात व कसे बसावे याची प्रात्यक्षिकेही देतात. मात्र बहुतेक सर्वांनाच याचा विसर पडत असतो. आपल्याला योग्य वाटेल त्याच पोझमध्ये माणसे बसतात आणि कामे उरकतात. मग पाठदुखी मागे लागते.

सरळ ताठ बसा अशी सारखी आठवण करून देणारा एक बेल्ट बाजारात दाखल झाला असून त्याचे नांव आहे ल्यूमो बेल्ट. कपड्यांच्या आत हा बेल्ट सहज घालता येतो. तुमची कंबर वाकतेय असे लक्षात येताच हा बेल्ट व्हायब्रेट होऊन तुम्हाला सूचना देतो आणि सरळ बसण्याची आठवण करून देतो. इतकेच नव्हे तर किती वेळ वाकून काम केले, किती वेळ तुम्ही ताठ बसला होतात, किती वेळा सरळ उभे राहिलात याचा स्कोअरही तुम्हाला तो कांही सेकंदात देतो. या स्कोअरमुळे सरळ बसण्यासाठी प्रोत्साहन मिळते असा उत्पादकांचा दावा आहे.

भारतात हा बेल्ट मिळण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Leave a Comment