कोल्हापूर अंबाबाई वज्रलेप वाद सुटण्याची चिन्हे

महालक्ष्मीच्या साडेतीन पीठातील एक आणि केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीला वज्रलेप करण्याचा तिढा समोपचाराने सोडविला जाणार असल्याचे वृत्त आहे. गेली १२ वर्षे हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते ते आता वैकल्पिक विवाद निवारण केंद्राकडे सोपविले गेले आहे.

या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार अंबाबाईची मूर्ती खूप प्राचीन आहे. तिच्यावर रोज अभिषेक होत असल्याने मूर्तीची झीज होऊ लागली होती. ती थांबविण्यासाठी वज्रलेप करावा असा सल्ला मंदिराचे अभ्यासक आणि मूर्ती तज्ञांनी दिला होता. त्यावर लोकांची मते मागविण्यासाठी समिती नेमली गेली होती. समितीनेही वज्रलेप करण्यास संमती दर्शविली मात्र कांही जणांच्या विरोधामुळे प्रकरण न्यायालयात गेले. गेली १२ वर्षे हे प्रकरण प्रलंबित आहे. अखेर हे प्रकरण वैकल्पिक विवाद निवारण केंद्राकडे वर्ग करण्यात आले आहे.

त्यानुसार आता विरोधक आणि वज्रलेप कराण्यास संमती असलेले असे दोन्ही पक्ष आमोरासमोर येऊन चर्चा करणार आहेत. त्यानंतर वज्रलेप करायचा की नाही याचा निर्णय सामोपचाराने केला जाणार आहे असे समजते.

Leave a Comment