आदर्श घोटाळयात शिवाजीराव निलंगेकरांना दिलासा

मुंबई – आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाने शिवाजीराव पाटील-निलंगेकर निर्दोष असल्याचे म्हटले आहे. आदर्श घोटाळयात शिवजीराव निलंगेकरांच्या विरोधात त्यांनी गुन्हा केल्याचा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही त्यामुळे त्यांचा आरोपपत्रामध्ये आरोपी म्हणून समावेश करता येणार नाही असे सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे.

आदर्श घोटाळयाचा तपास करताना जे साहित्य मिळाले त्यावरुन शिवाजीराव निलंगेकरांना आरोपी ठरवता येणार नाही त्यामुळे त्यांच्या नावाचा आरोपपत्रामध्ये समावेश केलेला नाही असे सीबीआयने म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी शिवाजीराव नि्लंगेकर यांना आदर्श घोटाळयात आरोपी करावे अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याला उत्तर म्हणून सीबीआयने हे प्रतिज्ञापत्र दाखल केले. शिवाजीराव पाटील-निलंगेकरांनी तत्कालीन महसूल मंत्री असताना, आदर्श सोसायटीला काही बेकायदा परवानग्या दिल्या होत्या. त्या बदलत्यात त्यांच्या जावयाला आदर्शमध्ये फ्लॅट मिळाला असा आरोप वाटेगावर यांनी आपल्या याचिकेत केला होता. आदर्शमधील बेनामी व्यवहारांचा तपास प्रगतीपथावर असल्याचे सीबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Leave a Comment