अॅपलची नजर कार आणि वैद्यकीय उपकरण निर्मितीवर

अॅपलच्या जगभर गाजत असलेल्या आयफोन  मालिकेच्या उत्पादनातून होत असलेली कमाई उतरणीस लागली असल्याने अॅपलने कमाई वाढविण्यासाठी नवीन क्षेत्रांकडे लक्ष वळविले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यानुसार अॅपल कार उत्पादन आणि वैद्यकीय उपकरणे उत्पादन या क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रीत करत आहे.

अॅपलचे वरीष्ठ संचालक एडियन पेरिका यांनी गतवर्षीच इलेक्ट्रीक कार बनविणार्‍या टेस्ला मोटर्स बरोबर चर्चा करून त्यांचे मॉडेल एस अधिग्रहित केले आहे असेही समजते. त्याचबरोबर हृदयाचा झटका येण्याची सूचना देणारे उपकरण, नसातून वाहणार्‍या रक्ताच्या आवाजाच्या नोंदी घेऊन त्यानुसार इशारा देणारे उपकरण आणि सेन्सर यांच्या उत्पादनाची तयारीही अॅपलमध्ये सुरू आहे. कंपनीचे उपाध्यक्ष जेफ विलियम्स यांनी या संदर्भात खाद्य आणि औषध प्रशासनाचे प्रमुख डॉ. मार्गारेट हॅम्बर्ग आणि डॉ.जेफ्री शूरेन यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही अधिकार्‍याकडे अशा उपकरणाराच्या उत्पादन परवानगीचे अधिकार आहेत.

Leave a Comment