अमेरिकन सुरक्षा यंत्रणेचा विमान कंपन्यांना इशारा

वॉशिग्टन – अमेरिकेकडे येणार्‍या विमानातून येणारे दहशतवादी बूटामधून स्फोटके आणण्याची शक्यता असल्याचा इशारा अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी विमानकंपन्यांना दिला आहे. एक महिन्याच्या अवधीत दुसर्यांतदा असा इशारा विमान कंपन्यांना मिळाला आहे. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी ने हा इशारा दिला आहे.

अमेरिकेला दहशतवादी संघटनांपासून असलेला धोका संपलेला नाही. हे दहशतवादी बूट, सौंदर्य प्रसाधने अथवा द्रव पदार्थांच्या स्वरूपात स्फोटके आणण्याचे प्रयत्न सातत्याने करत आहेत. परिणामी सुरक्षा यंत्रणांनी विमान कंपन्यांशी सतत संपर्क ठेवला आहे. हा इशारा अमेरिकेतून बाहेर जाणार्‍या अथवा अंतर्गत उड्डाणे करणार्‍या विमान कंपन्यांसाठी नाही तर दुसऱ्या देशातून अमेरिकेत येणार्‍या विमान प्रवाशांसाठी आहे असाही खुलासा केला गेला आहे.

२००१ च्या ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकवेळा इस्लामी दहशतवाद्यांनी कपडे, बूटातून स्फोटके आणण्याचे प्रयत्न केले असले तरी ते सर्व निष्फळ ठरले असल्याचे सुरक्षा संस्थांकडून सांगितले जात आहे.

Leave a Comment