शास्त्रज्ञानी शोधला मेंदूतील झोप आणणारा स्विच

सर्व सजीवांना झोपेची आवश्यकता असते आणि त्यांचे झोपेचे वेळापत्रकही निश्चित असते. माणसे झोपतात, तसेच झाडे, प्राणी, पक्षी अगदी किडामुंग्याही झोपतात. शरीराला कधी झोपायचे याची आज्ञा मेंदूकडून दिली जात असते हे आजपर्यंतचे ज्ञात ज्ञान होते. मात्र अशी आज्ञा देणारा स्विच आता संशोधकांना सापडला आहे. परिणामी निद्रानाशाने त्रस्त असलेल्या माणसांच्या उपचारात या शोधाचा चांगला उपयोग होऊ शकणार आहे.

ऑकसफर्ड विद्यापीठाच्या न्यूरोलॉजिस्ट वैज्ञानिकांच्या टीमने हा नवा शोध लावला आहे. माइनेन बॉक यांच्याकडे या टीमचे नेतृत्त्व होते. मेंदूतील एक घटक मेंदूतील या झोपेची आज्ञा देणार्‍या न्यूरॉन्सचे नियंत्रण करतो असे त्यांना मधमाशांवर केलेल्या संशोधनातून आढळले आहे. त्याचे नामकरण होमिओस्टॅट असे केले गेले आहे. शरीर थकले की हा होमिओस्टॅट कार्यान्वित होतो आणि न्यूरॉन्सचे नियंत्रण करतो परिणामी झोप येते. शरीर थकले की हे न्यूयॉन्स जोरात आक्रोश करतात असे बॉक यांचे म्हणणे आहे.

हा स्विच सापडला असला तरी शरीर थकले की शरीराकडून मेंदूकडे काय सिग्नल जातात याचा अभ्यास ही टीम करणार आहे. सजीव जागा असताना हे सिग्नल देणारया पेशी काय मॉनिटर करतात याचाही शोध त्यांना घ्यायचा आहे. झोपेसाठी दोन कारणे असू शकतात ती म्हणजे बॉडी क्लॉक जे शरीराची चोवीस तासाची सायकल ठरवते आणि दुसरे हे होमिओस्टॅट जे तुम्ही किती तास जागे आहात हे जाणून तशा आज्ञा मेंदूकडे देते. घरातील थर्मोस्टॅट ज्याप्रमाणे तापमान वाढले की आपोआप स्वीच ऑफ करतो त्याच धर्तीवर होमिओस्टॅटही काम करतो असेही या गटाचे म्हणणे आहे.

Leave a Comment