फेसबुकने केली व्हॉटस अॅपची खरेदी

अतिशय वेगाने विकास होत असलेल्या व्हॉटसअॅप या मेसेज सेवा देणार्‍या अॅपची खरेदी सोशल नेटवर्क साईट फेसबुकने १६ अब्ज डॉलर्सना केली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही खरेदी कॅश आणि स्टॉक स्वरूपात केली गेली असल्याचे समजते. यामुळे फेसबुकचा जगभरातला विस्तार अधिक रूंदावण्यास मोठा हातभार लागणार असल्याचे फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचे म्हणषे आहे.

व्हॉटसअॅप हे क्रॉस प्लॅटफॉर्म मोबाईल अॅप असून ते आपल्या युजरला टेलिकॉम चार्जेस न देताच मेसेज देवाणघेवाण करण्याची सुविधा देते. त्यामुळे जगभरातील मोबाईल युजर त्याला प्राधान्य देत असून आत्तापर्यंत त्यांचे ४५ कोटी युजर आहेत. फेसबुकने त्याची खरेदी आणि भागीदारी  केल्यामुळे फेसबुकचा युजर बेस ४५ कोटींनी वाढणार आहे. त्यामुळेच फेसबुकचे हे सर्वात मोठे अधिग्रहण ठरले असल्याचे झुकेरबर्ग यांनी जाहीर केले आहे.

ही खरेदी करताना व्हॉटसअॅपला १२ अब्ज डॉलर्स किमतीचे फेसबुकचे शेअर्स आणि ४ अब्ज डॉलर्सची कॅश दिली जाणार आहे. शिवाय व्हॉटसअॅपचा संस्थापक कोम आणि कंपनीतील कर्मचाऱ्याना ३ अब्ज डॉलर्स किमतीचे फेसबुकचे शेअर्स दिले जाणार आहेत. गेल्यावर्षीच फेसबुकने स्नॅनचॅट ही मेसेजिंग सेवाही ३ अब्ज डॉलर्सना खरेदी केली आहे.

Leave a Comment