नोकियाचा अँड्राईड फोन नोकिया एक्स नावाने येणार

दीर्घकाळ चर्चेत असलेला आणि नॉर्मंडी कोडनेमने प्रसिद्ध झालेला फिनलंड येथील हँडसेट कंपनी नोकियाचा अँड्राईड फोन नोकिया एक्स या नावाने बाजारात आणला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सुरवातीला नॉर्मंडी या नावाने हा फोन आणला जाणार होता मात्र ती कल्पना रद्द करून नवे नाव या फोनसाठी नक्की केले गेले आहे. बार्सिलोना येथे होत असलेल्या मोबाईल वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये हा फोन २४ फेब्रुवारीला सादर केला जात आहे.

नोकिया एक्स चार इंची स्क्रीनसह असून त्याला ४ जीबी इंटरर्नल स्टोरेज दिले गेले आहे. मायक्रो एसडीने हे स्टोरेज वाढविता येणार आहे. ५ मेगापिक्सलचा कॅमेरा, ड्युअल सिम, अँड्राईड ४.४ किटकॅट ही त्याची अन्य वैशिष्ठ्ये आहेत.

Leave a Comment